Talk:Inter-University Centre for Astronomy and Astrophysics

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

The link for Dr Naresh Dadhich goes to the page of some other person by the same name, will the original poster please correct that? Thanks. Kalpak 02:58, 5 June 2007 (UTC)[reply]

चंद्राच्या आकार मानावरून व कलेवरुन आमावस्या व पौर्णिमा ओळखणे( निरीक्षणे)[edit]

निलेश पांडुरंग बोराटे ,

'यशोदीप निवास',हायस्कूल रोड ,

                                                                                             गणेश कॉलनी नं २, पाटील नगर,
                                                                                            चिखली,तालुका- हवेली,जिल्हा-पुणे
                                                                                           ४११ ०६२ ,दिनांक:  12 /  01 /2017

प्रती ,




चंद्राच्या आकार मानावरून व कलेवरुन आमावस्या व पौर्णिमा ओळखणे( निरीक्षणे) महिन्यातून २९ दिवस चंद्र दिसण्याचा कालावधी असतो . चंद्राचा आमवस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा प्रवास हा त्याच्या आकार मानाप्रमाणे एकून चार प्रकारच्या टप्प्यामध्ये असतो . तो असा कि ,१)कोन २)कोनमापक ३) कोनमापकाचा पृष्ठभाग ४) गोल .





आमावस्या संपल्यानंतर चंद्राचा प्रवास हा त्याच्या आकार मानाप्रमाणे व कलेप्रमाणे चंद्राच्या रेषेपासून सुरु होतो . नंतर दुसऱ्या दिवशी त्या रेषेचे त्याच्या आकार मानानुसार व कलेनुसार कोनात रुपांतर होते व हळुहळू त्याच्या कोणाचा चार -चार दिवसांचा एक टप्पा पूर्ण होतो . रेषेचे दुसऱ्या दिवशी कोनात रुपांतर होत असल्यामुळे त्याचे चार -चार प्रमाणे टप्पे करता येत नाहीत . हि जी रेष आहे ती बऱ्याचदा दुर्मिळ असते . कारण आमावस्या संपल्यानंतर ती संध्याकाळी संधी प्रकाशातच मावळत असल्यामुळे बऱ्याचदा ती दिसत नाही . हि जी रेष (चंद्रकोर )आहे ती आमावस्या प्रारंभीच्या दिवशी पहाटे लवकर उगवते व आमावस्या संपल्यानंतर संध्याकाळी संधी प्रकाशात लवकर मावळते . चंद्राची रेष तयार झाल्यानंतर चंद्राचा प्रवास हा त्याच्या आकार मानाप्रमाणे व कलेप्रमाणे कोनापासून सुरु होतो व तो प्रवास चार दिवसांचा असतो. त्यानंतर चंद्राचा कोनामापकाचा प्रवास सुरु होतो . व तो पण चार दिवसांचा असतो . त्यानंतर चंद्राचा कोण मापकाच्या पृष्ठभागाचा प्रवास सुरु होतो . व तो पण चार दिवसांचा असतो. त्यानंतर चंद्राचा गोल तयार होतो . थोडक्यात सांगायचे झाल्यास चंद्राची रेष एक दिवस , कोणाचा एक टप्पा ४ दिवस , कोनमापकाचा दुसरा टप्पा ४ दिवस, कोण मापकाच्या पृष्ठभागाचा तिसरा टप्पा ३ दिवस . अशा प्रकारे त्याच्या प्रवासाचे आमावस्ये पासून पौर्णिमा प्रारंभ येईपर्यंत एकूण १२ दिवस भरतात . व बाराव्या दिवशी चंद्राचा गोल तयार होतो . व त्याच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमा प्रारंभ असतो . चंद्राचा गोलाकार प्रवास हा पाच दिवसांचा असतो व त्यानंतर संकष्ट चथुर्ति दरम्यान चंद्राचा आमवस्येचा प्रवास सुरु होतो . पौर्णिमेपासून ते आमावस्या येईपर्यंत चंद्राचा प्रवास हा चंद्राच्या आकार मानानुसार व कलेनुसार कोन मापकाच्या पृष्टभागापासून सुरु होतो . व तो चार दिवसांचा असतो . व त्यानंतर चंद्राचा कोण मापकाचा प्रवास सुरु होतो व तो पण चार दिवसांचा असतो. त्यानंतर चंद्राचा कोनाचा प्रवास सुरु होतो. व तो पण चार दिवसांचा असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर कोन मापकाच्या पृष्टभागाचा एक टप्पा ४ दिवस ,कोण मापकाचा दुसरा टप्पा ४ दिवस ,कोनाचा तिसरा टप्पा ४ दिवस . अशा प्रकारे त्याच्या प्रवासाचे पौर्णिमेपासून आमावस्या येईपर्यंत त्याच्या गोलाकार प्रवासा सहित सोळा दिवस भरतात . व त्यानंतर आमावस्या प्रारंभ सुरु होतो . आमावस्या संपल्यानंतर चंद्र हा रात्री पश्चिम दिशेला त्याच्या आकार मानानुसार व कलेनुसार कोनाच्या स्वरुपात दिसतो व हळूहळू रोज त्याचा आकार वाढत जाताना दिसतो व त्याचे रोजचे अवकाशामधले अंतर देखील पूर्वेकडून पश्चिम दिशेला वाढत जाताना दिसते . व तो रोज पौर्णिमा येईपर्यंत मोठा होत जाताना दिसतो . . पौर्णिमा संपल्यानंतर चंद्र हा दिवसा पश्चिम दिशेला त्याच्या आकार मानानुसार व कलेनुसार लहान होत जाताना दिसतो. व रोज हळूहळू त्याचे आकार मान लहान होत जाते . व तो रोज आमावस्या येईपर्यंत दिवसा किंवा पहाटे लहान होत जाताना दिसतो . आमावस्या संपल्यानंतर चंद्र हा रात्री पश्चिम दिशेला ज्या वेळेस पूर्णपणे मावळतो त्या वेळेस तो एखाद्या लहान चांदणी प्रमाणे झाल्यासारखा वाटतो . व ज्या वेळेस तो मावळतो त्या वेळेस तो त्याच्या प्रकाशाप्रमाणे अंधुक व लालसर कलर धारण करतो उन्हाळा ,पावसाळा व हिवाळा या चार -चार महिन्यांच्या ऋतुंमध्ये जेव्हा बदल होतात , त्यावेळेस नुकतीच आमवाश्या किंवा पौर्णिमा झालेली असते. पौर्णिमा संपल्यानंतर चंद्रोदय हा संध्याकाळी होतो व चंद्रास्त हा दिवसा होतो . अमावस्या संपल्यानंतर चंद्रोदय हा त्याच्या वेगवेगळ्या वेळेप्रमाणे सकाळी होतो व चंद्रास्त हा रात्री होतो . ज्या दिवशी पौर्णिमा प्रारंभ असतो त्या दिवशी संध्याकाळी पश्चिम दिशेला सूर्यास्त होतो व पूर्व दिशेला चंद्रोदय होतो व नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संधी प्रकाशातच चंद्रास्त होतो . ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी सकाळी पूर्व दिशेला सूर्योदय होताच लगेच पश्चिम दिशेला चंद्रास्त होतो. म्हणजे महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला चंद्र -सूर्याची युती होते . आमवश्या संपल्यानंतर चंद्राचा कोन व चंद्राचे कोनमापक पूर्व दिशेच्या बाजूने असते व त्याचे आकारमान रोज हळूहळू मोठे होत जाताना दिसते . तर पौर्णिमा संपल्यानंतर चंद्राचे कोनमापक व चंद्राचा कोन हे पश्चिम दिशेच्या बाजूने असते. व त्याचे आकारमान रोज हळूहळू लहान होत जाताना दिसते. पण हा फरक लक्षात घेण्याकरता आपल्याला आमवाश्या संपल्यानंतर रात्री आकाशात चंद्र बघावा लागेल तर पौर्णिमा संपल्यानंतर दिवसा आकाशात चंद्र बघावा लागेल निसर्ग नियमाप्रमाणे चंद्र हा त्याच्या वेगवेगळ्या वेळानुसार उगवत असला तरी तो रोज ४० मिनिटांनी उशिरा उगवत असतो व उशिराने मावळत असतो .

  • माझ्या निरीक्षणाप्रमाणे काही ठराविक महिन्यामध्ये जेव्हा आमवश्या येते तेव्हा चंद्र न दिसण्याचा कालावधी हा दोन दिवस असतो . तर तो असा कि , १) आमावश्येच्या दिवशी न दिसणे ,२) आमवश्या संपल्यानंतर एक दिवस न दिसणे . त्यानंतर शुध्द द्वितीयेला चंद्र दर्शन सुरु होते व चंद्राची रेष (चंद्रकोर ) तयार होते .

तर काही ठराविक महिन्यामध्ये जेव्हा आमवश्या येते तेव्हा चंद्र न दिसण्याचा कालावधी हा एक दिवस असतो तर तो असा कि आमवश्येच्या दिवशी न दिसणे , थोडक्यात सांगायचे झाले जानेवारी ते जून या ठराविक कालावधीत दिवस जसा हळूहळू मोठा होत जातो तशी आमवश्या हि दोन दिवसांची (चंद्र न दिसण्याचा कालावधी) म्हणजे मोठी होत जाते. याउलट पौर्णिमेचा गोलाकार चंद्र हा सहा दिवस असतो . व तो संकष्ट चतुर्थीच्या दिवसापर्यंत असतो. यावरून सहा महिन्यांनी दिवस जसे लहान होत जातात तशी अमावास्या (चंद्र न दिसण्याचा कालावधी )हि लहान होत जाते, तर सहा महिन्यांनी दिवस जसे मोठे होत जातात तशी पौर्णिमा (पौर्णिमेचा गोलाकार चंद्र ) हि मोठी होत जाते असा अंदाज बांधता येऊ शकतो* चंद्राचा गोलाकार प्रवास ५ दिवस दिसण्याचे कारण असे कि , चंद्राच्या पृष्ठभागाच्या टप्प्याचा शेवटचा दिवस (चौथा) म्हणजे पहिला गोल व नंतर पौर्णिमा प्रारंभीच्या दिवशी दिसणारा दुसरा गोल व नंतर पौर्णिमेच्या दिवशी दिसणारा तिसरा गोल व पौर्णिमा संपल्यानंतर एक दिवस दिसणारा चौथा गोल व त्यानंतर संकष्ट चतुर्थी दरम्यान आमवाश्याच्या प्रवासाची सुरुवात करणारा पाचवा गोल , थोडक्यात सांगायचे झाले तर , १)पृष्ठभागाच्या टप्प्याचा शेवटचा दिवस-गोल ,२)पौर्णिमा प्रारंभीचा दिवस-गोल ,३)पौर्णिमेचा दिवस-गोल ,४)पौर्णिमा संपल्यानंतरचा एक दिवस -गोल ,५)आमवाश्याच्या प्रवासाची सुरुवात करणारा-गोल (पृष्ठभागाचा शेवटचा टप्पा ) पण हि चंद्राची अवस्था जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत पाहण्यास किंवा अनुभवास मिळते . पण चंद्राच्या या पाच गोलाकार प्रवासामध्ये फरक असा जाणवतो की , ज्या दिवशी पृष्टभागाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी चंद्राचा गोल हा पूर्ण होण्याला थोडासा कमी जाणवतो . त्यानंतर पौर्णिमा प्रारंभीच्या दिवशी चंद्राचा पूर्ण गोल तयार झाल्यासारखा वाटतो . त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळेस चंद्रोदय होतो , त्या वेळेस तो आकाराने मोठा जाणवतो .,पौर्णिमा संपल्यानंतर एक दिवस चंद्राचा गोल हा थोडासा लहान दिसतो पण पूर्ण दिसतो ,त्यानंतर आमावस्याच्या प्रवासाची सुरुवात करताना (संकष्ठ चतुर्थी दरम्यान ) चंद्राचा गोल हा आकाराने कमी जाणवतो .

थोडक्यात सांगायचे म्हणजे , चंद्राचे  एक व पाच नंबरचे हे २ गोल आकाराने कमी जाणवतात व उर्वरित २,३,४ नंबरचे हे तीन गोल आकाराने पूर्ण जाणवतात.

जानेवारी ते जुन या सहा महिन्याच्या कालावधीत चंद्राचा गोलाकार प्रवास सहा दिवस असतो . तर तो असा कि १) चंद्राच्या पृष्ठभागाचा शेवटचा दिवस म्हणजे गोल , २) त्यानंतर पौर्णिमा प्रारंभीच्या दिवशी दिसणारा चंद्र म्हणजे गोल , ३) पौर्णिमेच्या दिवशी दिसणारा चंद्र म्हणजे गोल, ४) पौर्णिमा संपल्यानंतर एक दिवस दिसणारा चंद्र म्हणजे गोल, ५) पौर्णिमा संपल्यानंतर अजून एक दिवस दिसणारा चंद्र म्हणजे गोल, ६) आमावश्याच्या प्रवासाची सुरुवात करणारा चंद्र म्हणजे गोल . चंद्राच्या या सहा गोलाकार प्रवासापैकी १ व ६ नंबरचे दोन गोल हे आकाराने थोडेसे कमी दिसतात व उर्वरित २,३,४,५ नंबरचे हे चार गोल हे आकाराने पूर्णपणे गोल दिसतात संकष्ट चतुर्थी संपल्यानंतर चंद्राचा त्याच्या आकार मानाप्रमाणे व कलेप्रमाणे अमावश्याच्या दिशेने प्रवास सुरु होतो . जशी अमावश्या जवळ येत राहील तसा चंद्र हा पृथ्वीपासून दूर जातो (४०६३७९ कि.मी) तर जशी पौर्णिमा जवळ येत राहील तसा चंद्र हा पृथ्वी जवळ (३५८४६४ कि.मी.) येतो. अमावश्या ते पौर्णिमा व पौर्णिमा ते अमावश्या या महिन्याभराच्या प्रवासात चंद्राचा गोलाकार प्रवास हा मध्यस्तीची (सेंटरची ) भूमिका पार पाडतो .

  • आमवश्या संपल्यानंतर चंद्र आकाशात बघताच ज्या दिवशी चंद्र आहे त्या दिवसापासून पौर्णिमा प्रारंभ येईपर्यंत पुढचे दिवस मोजावे लागतात . तर पौर्णिमा संपल्यानंतर चंद्र आकाशात बघताच ज्या दिवशी चंद्र आहे तो दिवस गृहीत धरून आमवश्या प्रारंभ येईपर्यंत दिवस मोजावे लागतात. पण हे दिवस मोजताना यामध्ये काही ठराविक कालावधीमध्ये किंवा महिन्यामध्ये एक दिवसाचा फरक पडू शकतो . याचे कारण असे की , काही ठराविक कालावधीमध्ये पौर्णिमेचा गोलाकार चंद्र ५ व ६ दिवस दिसणे व आमवाश्येच्या कालावधीमध्ये चंद्र न दिसण्याचा कालावधी 1 ते 2 दिवस असणे .*

आमवाश्या संपल्यानंतर चंद्रोदय हा दिवसा किंवा दुपारी होत असल्यामुळे सूर्यास्त हा अगोदर होतो व नंतर रात्री चंद्रास्त होतो , तर पौर्णिमा संपल्यानंतर चंद्रोदय हा संध्याकाळी किंवा रात्री होत असल्यामुळे सूर्योदय हा अगोदर होतो व नंतर सकाळी किंवा दुपारी चंद्रास्त होतो . थोडक्यात आमवाश्या संपल्यानंतर सूर्योदय हा सकाळी होतो व नंतर त्याच्या मागोमाग चंद्रोदय होतो व सूर्यास्त हा संध्याकाळी होतो व नंतर त्याच्या मागोमाग रात्री चंद्रास्त होतो , तर पौर्णिमा संपल्यानंतर सूर्यास्त हा अगोदर होतो व नंतर त्याच्या मागोमाग संध्याकाळी किंवा रात्री चंद्रोदय होतो व नंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदय जसा सकाळी होतो त्याच्या नंतर चंद्रास्त होतो. जानेवारी ते जुन या कालावधीत दिवस मोठा असल्यामुळे आमवाश्या संपल्यानंतर संध्याकाळी चंद्रकोर (रेष ) जरा उशिरा दिसते .तर या उलट जुलै ते डिसेंबर या कालावधीत दिवस लहान असल्यामुळे आमवाश्या संपल्यानंतर संध्याकाळी चंद्रकोर (रेष ) जरा लवकर दिसते . जानेवारी ते जुन या कालावधीत ज्या वेळेस आमावस्या येते त्या वेळेस चंद्र न दिसण्याचा कालावधी हा एक दिवस असतो ,तर जुलै ते डिसेंबर या कालावधीत ज्या वेळेस आमावस्या येते त्या वेळेस चंद्र न दिसण्याचा कालावधी हा दोन दिवस असतो . म्हणजेच सहा -सहा महिन्यांनी त्यात एक दिवसाची तफावत जाणवते . हि जी तफावत आहे, ती तफावत चंद्र हा त्याच्या गोलाकार प्रवासात भरून काढतो . म्हणजेच सहा -सहा महिन्यांनी चंद्राचा गोलाकार प्रवास हा एक दिवसांनी वाढतो . ( जुलै ते डिसेंबर ५ दिवस व जानेवारी ते जुन ६ दिवस )

पौर्णिमा  संपल्यानंतर आपण ज्या दिवशी रात्री आकाशात चंद्र बघतो ,त्या जर तो पूर्ण गोलाकार दिसत असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच  चंद्राचा पृष्ठ  भाग आपल्याला कमी जाणवतो व त्यावरून सुध्या  आपल्याला  त्याच्या आकारमानाप्रमाणे  पुढच्या प्रवासाची दिशा कळते . पण हा फरक संकष्ट चतुर्थी झाल्यावर  लक्षात येतो . समुद्रातील  भरती ओहोटीची वेळ हि चंद्राच्या वेळेवर अवलंबून असते .
   *दर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र व सूर्याची युती होते . म्हणजेच चंद्र हा सूर्याच्या सरळ रेषेत किंवा तिरक्या लेन मध्ये असतो . २१ जुलै ते २१ डिसेंबर या कालावधीत सूर्याचा दक्षिणोत्तर प्रवास सुरु होतो व २१ जानेवारी ते २१ जून या कालावधीत सूर्याचे उत्तरायण सुरु होते व वर्षातून दोन महिने (सप्टेंबर व मार्च ) सुर्य हा बरोबर दोन दिशांच्या मध्यभागी येतो व त्या दोन महिन्यात दिवस व रात्र समान असतात . यावरून चंद्राची दिशा सुध्या दर महिन्याला तो कोणत्या दिशेस किंवा कोणत्या बाजूस असेल (उत्तर , दक्षिण व सेंटर ) याचा अंदाज बांधता येऊ शकतो . कारण सूर्याचा सरळ किंवा तिरक्या लेनमध्ये चंद्राचा प्रवास चालू असतो . पण ज्या वेळेस  चंद्र हा रात्री किंवा पहाटे उगवतो त्यावेळेस तो वेगवेगळ्या ग्रहांच्या किंवा ताऱ्यांच्या जवळ किंवा लेनमध्ये असतो . *

ज्या कालावधीत दिवस लहान होत जातात . त्या कालावधीत सूर्योदयाचा १ मिनिटांनी वेळ वाढत जाताना दिसतो तर सुर्यास्ताचा १ मिनिटांनी वेळ कमी होत जाताना दिसतो .तर याउलट ज्या कालावधीत दिवस मोठे होत जातात ,त्या कालावधीत सुर्यास्ताचा १ मिनिटांनी वेळ वाढत जाताना दिसतो तर सूर्योदयाचा १ मिनिटांनी वेळ कमी होत जाताना दिसतो. पण हा सूर्योदय व सुर्यास्ताचा एक मिनिटांचा फरक दर दोन दिवसांनी कमी -जास्त होताना किंवा वाढताना दिसून येतो . म्हणजेच ज्या कालावधीत दिवस लहान होत जातात त्या कालावधीत सूर्योदय हा रोज उशीरा उगवतो व सूर्यास्त हा लवकर होतो . तर या उलट ज्या कालावधीत दिवस मोठे होत जातात ,त्या कालावधीत सूर्योदय हा रोज लवकर उगवतो तर सूर्यास्त हा उशिरा होतो . आमवश्या संपल्यानंतर चंद्रोदय हा दिवसा होत असल्यामुळे चंद्राचे सर्व प्रकारचे आकार हे सूर्यप्रकाशामुळे स्पष्टपणे ओळखू येतात . तर पौर्णिमा संपल्यानंतर चंद्रोदय हा रात्री होत असल्यामुळे चंद्राचे सर्व प्रकारचे आकार हे स्पष्टपणे ओळखू येत नाहीत . याचे कारण चंद्रोदय हा ज्यावेळेस दिवसा होतो त्या वेळेस सूर्याचा प्रकाश चंद्राला थेट व डायरेक्ट मिळत असतो . तर चंद्रोदय हा ज्यावेळेस रात्री होतो त्या वेळेस सूर्याचा प्रकाश चंद्राला पूर्णपणे मिळत नाही पंचांग : -पंचांगाप्रमाणे आपल्या मराठी महिन्याची सुरुवात दर महिन्याच्या आमावस्या समाप्तीनंतर सुरु होते . त्या मध्ये प्रतिपदा ते चौरोदशी या प्रमाणे एक भाग आमावस्या पर्यंतचा असतो व नंतर दुसरा भाग प्रतिपदा ते चौरोदशी या प्रमाणे पौर्णिमेपर्यंतचा असतो. व १५ व्या दिवशी आमावस्या व पौर्णिमा असते . अशा प्रकारे प्रत्येक मराठी महिना हा तीस दिवसांचा असतो . आमावस्या संपल्यानंतर चंद्राचा आकार हा मोठा होत जात असल्यामुळे पंचांग हे सरळ मार्गाने मोजावे लागते (बेरीज करून ) उदा . आज प्रतिपदा असेल तर अजून दोन दिवसांनी तृतीया. तर या उलट पौर्णिमा संपल्यानंतर चंद्राचा आकार हा लहान होत जात असल्यामुळे पंचांग हे उलट्या (रिव्हर्स )मार्गाने मोजावे लागते . (वजाबाकी करून)(उदा . समजा आज नवमी आहे तर ते असे कि ,(१४-५=९)

  	 आमवश्या संपल्यानंतर चंद्राचा आकार हा मोठा होत असल्यामुळे एकादशी हि चंद्राच्या पृष्ठभागाच्या प्रवासादरम्यान सुरु होते . तर पौर्णिमा संपल्यानंतर चंद्राचा आकार हा लहान  होत असल्यामुळे एकादशी हि चंद्राच्या कोनाच्या प्रवासादरम्यान सुरु होते. याचे कारण आमवश्या प्रारंभ व पौर्णिमा प्रारंभीच्या तीन दिवस अगोदर  एकादशी असते . 
आमवश्या संपल्यानंतर चंद्राचा त्याच्या आकारमानाप्रमाणे शुद्ध त्रयोदशीला पहिला गोल तयार होतो . तर या उलट पौर्णिमा संपल्यानंतर  चंद्राचा त्याच्या आकारमानाप्रमाणे शुद्ध त्रयोदशीला पहाटे कोन तयार होतो 
  आमवश्या संपल्यानंतर चंद्राचा त्याच्या आकारमानाप्रमाणे विनायक चतुर्थीला संध्याकाळी कोणाच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यानुसार चंद्राचा दुसरा आकार तयार होतो तर या उलट पौर्णिमा संपल्यानंतर  चंद्राचा त्याच्या आकारमानाप्रमाणे कोनमापकच्या  पृष्ठभागाचा  प्रवासाचा पहिल्या टप्प्याचा आकार तयार होतो

सहा -सहा महिन्यांनी म्हणजेच जानेवारी ते जून व जुलै ते डिसेंबर या कालावधीत चंद्राच्या गोलाकार प्रवासात एक एक दिवसांची वाढ व घट होत असल्यामुळे आमवश्या , एकादशी, पौर्णिमा प्रारंभ व संकष्ट चतुर्थी यामध्ये एक एक दिवसांनी फरक पडत जातो . म्हणजेच सर्व चारही बाबतीत एक एक दिवसांची तफावत जाणवते . सर्व चारही गोष्टी एक एक दिवसांनी पुढे मागे होत राहतात . उदा . जानेवारी ते जुन या कालावधीत पौर्णिमा प्रारंभ संपल्यानंतर पाच दिवसांनी संकष्ट चतुर्थी येते . तर या उलट जुलै ते डिसेंबर या कालावधीत पौर्णिमा प्रारंभ संपल्यानंतर चार दिवसांनी संकष्ट चतुर्थी येते. थोडक्यात सांगायचे झाले तर पंचांग प्रमाणे प्रतिपदा ते चौरोदशी हे सर्व काही सहा -सहा महिन्यांनी एक एक दिवसाने मागे -पुढे होत राहते . पंचांग प्रमाणे ज्या कालावधीत शुद्ध प्रतिपदेला चंद्र दर्शन असते त्या कालावधीत आमावश्येच्या दिवशी चंद्र न दिसण्याचा कालावधी हा एक दिवस असू शकतो . तर ज्या कालावधीत शुद्ध द्वितीयेला चंद्र दर्शन असते त्या कालावधीत आमावश्येच्या दिवशी चंद्र न दिसण्याचा कालावधी हा दोन दिवस असू शकतो .

	 वरील सर्व निरीक्षणे लक्षात घेतल्यास आपल्याला आकाशात चंद्र बघताच अगदी अचूकपणे पौर्णिमा व अमावश्या सांगता येते . पण त्याकरता दररोज आपल्याला आकाशात चंद्र बघावा लागेल व त्याचे सर्व आकार व कला लक्षात घ्याव्या लागतील व त्याच्या दररोजच्या आकारात आपल्याला काय फरक जाणवला हे लक्षात घ्यावे लागेल .
                                                                                                   निलेश पांडुरंग बोराटे
                                                                                                                                  9922456557

boratenileshp@gmail.com — Preceding unsigned comment added by 49.14.223.48 (talk) 17:43, 23 January 2017 (UTC)[reply]

External links modified (January 2018)[edit]

Hello fellow Wikipedians,

I have just modified 2 external links on Inter-University Centre for Astronomy and Astrophysics. Please take a moment to review my edit. If you have any questions, or need the bot to ignore the links, or the page altogether, please visit this simple FaQ for additional information. I made the following changes:

When you have finished reviewing my changes, you may follow the instructions on the template below to fix any issues with the URLs.

This message was posted before February 2018. After February 2018, "External links modified" talk page sections are no longer generated or monitored by InternetArchiveBot. No special action is required regarding these talk page notices, other than regular verification using the archive tool instructions below. Editors have permission to delete these "External links modified" talk page sections if they want to de-clutter talk pages, but see the RfC before doing mass systematic removals. This message is updated dynamically through the template {{source check}} (last update: 18 January 2022).

  • If you have discovered URLs which were erroneously considered dead by the bot, you can report them with this tool.
  • If you found an error with any archives or the URLs themselves, you can fix them with this tool.

Cheers.—InternetArchiveBot (Report bug) 02:54, 23 January 2018 (UTC)[reply]