User:मनोज शिरसाठ
Appearance
कल्पनेचे धड अणूपासून अंतापर्यंत सारं काही चाललंय तुझ्या मनासारखं मी फक्त निमित्त, मर्यादेपेक्षा उन्मत्त, बंधनात अडकूनही स्वतःला समजायचं स्वायत्त.... नेमकं काय? दिशा कोणती? अंधारात जाळायच्या पणत्या किती? उजळेल आकाश? होईल प्रकाश? खोटी समजूत, खरा वाटणारा,खोटाच भास... कोणता रस्ता? कोणती पायवाट? म्हणे मोक्षच सोडवतो बंधाची गाठ... होईल पहाट? आत वाट पाहतेय निजलेली रात्र होऊन गलितगात्र शुन्य मी,शुन्यच मी तरी का म्हणून बेरीज वजाबाकीत अडकतो स्वतःची सत्ता सांगत अभिमानाने फडकतो कळत नाही, इतकंच कळतं माझ्या अज्ञानाचं धड तुझ्या कल्पनेपाशी लोळतं
मनोज शिरसाठ अस्ताणे ता.मालेगाव जि.नाशिक 9518519779