Jump to content

User:Dnyaneshwar Mundalik

From Wikipedia, the free encyclopedia
  • सुमन लोकसेवा संस्थेतर्फे मोफत वृद्धाश्रमाची नोंदनी सुरु*

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या सुमन लोकसेवा संस्थेतर्फे पानशेतजवळ *"पोळे"* या गावी सुरू होत असलेल्या वृद्धाश्रमाचे काम लवकरच पुर्ण होत आहे. त्यात संस्था गरीब निराधार वृद्धांचा मोफत सांभाळ करनार आहे. यामध्ये सुरुवातीस ५० व्यक्तींची मर्यादा असणार आहे.त्यासंदर्भात नाव नोंदणी सुरु झाली आहे

कृपया अनाथ निराधार गरीब गरजु  वृद्ध आपल्या शेजारी आसपास आढळल्यास सुमन लोकसेवा संस्थेशी संपर्क करा.

आश्रमाविषयी थोडस --

  • "पोळे"* या गावाविषयी सांगायचे झाल्यास पुण्यापासुन साधारण ६० ते ६५ किमी वर डोंगराच्या कुशीत पानशेत धरनाच्या मागील पानसाठ्यालगत वसलेले हे छोटस गाव म्हणजे निसर्ग सौंदर्याची उधळन असलेला पृथ्वीवरचा स्वर्गच. या भागाचा सहवास लाभने म्हनजे त्याची अनुभुतीच. निसर्ग वेलींनी व्यापलेले उंच डोंगर, भर उन्हात मंद गार वारा, पाण्याची नागमोडी वळणं आणि त्यात दिसनारे सुर्य चंद्रासह संपूर्ण परिसाराचे प्रतिबिंब, हिवाळ्यात सकाळच्या प्रहरी दिसनारे दाट धुके, पावसाळ्यात तर सरीवर सरी व मधेच ऊन आणि नभात इंद्रधनुषाची खैरात, चोहीकडे धबधब्यांचा मन सुखावनारा खळखळाट, पहाटे मोरांचा नाच तर कुठे पक्षांचा जाग आननारा किलबिलाट, डोळ्यांनी, कानांनी, मनाने निसर्ग सुखाचा खरा आनंद येथील वृद्धांना उपभोगता यावा व त्यांचे आयुष्यमान वाढावे याचकरीता शुद्ध वातावरण व विलोभनिय निसर्गसौंदर्य लाभलेल्या *"पोळे"* गावची निवड संस्थेने वृद्धाश्रमासाठी केली आहे.

इतर सुख सोई - आश्रमातच सेंद्रीय शेती करुन ताजा भाजीपाला पिकवुन वृद्धांसाठी सात्विक आहार देनार असुन राहनीमान साधे असेल, महिन्यातुन एकदा वैद्यकीय तपासणी करत आहार विहार सोबत मन प्रफुल्लित रहान्यासाठी व काँस्मिक ऊर्जा ग्रहन करण्यासाठी संस्थेकडुन इथे दत्तमंदिर व ध्यानमंदीर उभारण्यात आले असुन त्यात वृद्धांना योगा व ध्यान करता येईल तसेच रोज भजन व पुजन सुरुच असेल तेथे दर पोर्णिमेस भंडारा ऊत्सव सुरु असुन दत्तजयंत्ती ही उत्साहात साजरी केली जाते. ज्यात सर्व निराधार वृद्धांचे जीवन सुखावुन जाईल.. तरी

संस्था सर्वांना आवाहन करत आहे की कृपया आपण आपल्या आसपास असलेल्या निराधार, गरीब गरजु, बेघर वृद्धांची माहिती  संस्थेस संपर्क करुन कळवावी जेने करुन त्यांना मायेचा आधार मिळेल... 

डॉ. ज्ञानेश्वर मुंडलिक सुमन लोकसेवा संस्था 8888431157 Step up for humanity info@sumanlokseva.org Www.sumanlokseva.org