User:MhalasaDevi
म्हाळसा या नावातच मोठा अर्थ भरला आहे. म्हाळसा मधील 'म' म्हणजे ममत्व आणि माया. 'ह' म्हणजे हर्ष किंवा आनंद. 'ल' सत्व म्हणजे तेज. म्हाळसादेवी ही श्रद्धाळू भक्तावर ममता करणारी आई आहे. ती आनंददायिनी आहे, प्रसन्नता देणारी आहे. ती अलौकिक अशा तेजाने युक्त आहे.
म्हाळसादेवी दोन वेगळ्या रूपामध्ये पूजली जाते. एका रूपामध्ये स्वतंत्र देवी म्हणून तिला मोहिनीचे रूप मानले जाते (भगवान विष्णूंचा स्त्री अवतार) आणि तिला म्हालसा नारायणी असे म्हणतात. दुसऱ्या रूपामधे म्हाळसादेवीची पूजा खंडोबाची पत्नी म्हणून केली जाते. या परंपरेत ती पार्वती, भगवान शिवाची पत्नी तसेच मोहिनीशी संबंधित आहे.
म्हाळसादेवीची कुलस्वामिनी म्हणून अहिर सुवर्णकार (सोनार) , लेवा पाटील , गौड सारस्वत ब्राम्हण , कऱ्हाडे ब्राम्हण , दैवज्ञ ब्राम्हण , भंडारी , शिंपी , वैष्णव आणि अनेक इतर समाज, जाती, कुळे पूजा करतात.
म्हाळसादेवींची मंदिरे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत. महाराष्ट्रबाहेर गोवा, कर्नाटक, केरळ, काश्मीर अश्या अनेक ठिकाणी देखील म्हाळसादेवीची मंदिरे आहेत.
ll श्री म्हाळसादेवीची आरती ll
ओम जय माता म्हाळसाई, जय माता म्हाळसाई,
पिंपरखेड वासिनी, उंबरखेड वासिनी I गिरणा तीरी राही ll
ओम जय माता म्हाळसाई ll१ll [धृ.]
प्रथम चरित्री कालिका झाली, ओम कालिका झाली,
कलकत्ता वासिनी, देवावरदायिनी l गंगा तीरी राही ll
ओम जय माता म्हाळसाई ll२ll
द्वितिय चरित्री रेणुका झाली, ओम रेणुका झाली,
जमदग्नीच्या लागी चरणी, परशुरामाची झाली जननी l माहूर गडी राही ll
ओम जय माता म्हाळसाई ll३ll
तृतीय चरित्री भवानी झाली, ओम भवानी झाली,
श्रीरामा वरदायिनी, शिवराया वरदायिनी l तुळजापुरी राही ll
ओम जय माता म्हाळसाई ll४ll
चतुर्थ चरित्री म्हाळसाई झाली, ओम म्हाळसाई झाली,
मणिमल्ल दैत्य वधुनी, भक्ता सुख दायिनी l जेजुरी गडी राही ll
ओम जय माता म्हाळसाई ll५ll
पंचमस्थानी दास गोरक्षवरदायी, ओम गोरक्षवरदायी
मम कुल वरदायिनी, सेवका वरदायिनी l भक्ता सदनी राही ll
ओम जय माता म्हाळसाई ll६ll