User talk:Ganesh B. Narawade
आपला हिंदू धर्म
[edit]बाहेरील देशातील लोक आपल्या धर्माचे, आपल्या धर्मातील चांगल्या गोष्टींचे, आपल्या परंपरांचे अनुकरण करत आहे आणि दुसऱ्या बाजूला, आपणच आपला धर्म, आपल्या चांगल्या परंपरा, आपले रीतीरिवाज नष्ट करण्याच्या पाठीमागे लागलेले आहोत. याचा आपण कधी विचार करणार आहोत की नाही? किती विचित्र गोष्ट आहे. प्रगतीच्या, विकासासाठी योग्य असेल त्या गोष्टी जरूर कराव्यात, परंतु आपल्या धर्मातील चांगल्या, मूळ गोष्टी, आपल्या परंपरा, आपले रितिरिवाजही आपण विसरता काम नये, नाहीतर येणारा काळ आपल्याला कधीच क्षमा करणार नाही. याचेही भान असूदया. कथा, प्रवचन, कीर्तन यातून चांगले विचार समाजामध्ये पसरत असतात. त्यामुळे समाज सुधारण्यास, समाजातील लोकांचे विचार सुधारण्यास, समाज एकसंध राहण्यास मदत होत असते. आपले पूर्वज खूप हुशार होते. मुळात आपल्या हिंदू धर्मात अंधश्रद्धा, चुकीच्या गोष्टींची नंतर भेसळ झाली किंवा काळाच्या ओघात ती होत गेली. त्या गोष्टी जर आपण काढून टाकून आपल्या मूळ गोष्ठी आत्मसात केल्या, जीवनात त्याची अंमलबजावणी केली तर आजही आपला फायदाच होईल. भजन, कीर्तनाने लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण होण्यास मदत होत असते. सध्याच्या काळात लोकांनी त्याचे विकृतीकरण चालविले आहे, भजन कीर्तन करण्यासाठी पैशाची उधळपट्टी करावी लागते, हे कुणी सांगितले? सध्याच्या लोकांनीच त्यांच्या मनाला वाटेल तसा खर्च करायचा, नको त्या ठिकाणी, पैशांची उधळपट्टी करायची आणि परत म्हणायचे यातून खूप खर्च होतो आहे म्हणून आम्ही या गोष्टी बंद करत आहोत. मुळात या गोष्टी कशासाठी असतात हे पहिल्यांदा समजून घेण्याची गरज आहे. मनामध्ये श्रद्धा असेल तर माणसाचे मन शांत राहण्यास मदत होते. ज्याच्या मनात मनापासून श्रद्धा असते त्याचे मन लवकर इतरत्र भरकटत नाही आणि देवाचे नामस्मरण केले तर तेव्हढ्या काळापुरते का होईना मनाला शांती लाभते. सध्या तर लोकांनी देवच हद्दपार करण्याचे काम चालविले आहे. आपला मूळ हिंदू धर्म अंधश्रद्धेला थारा देत नाही, मुळातच हिंदू धर्मच आपल्याला कळालेला नसतो. आपल्यापैकी किती जणांनी आपल्या धर्माचे मूळ आहे, (त्यामध्ये नंतर भेसळ केली गेली आहे ती सोडून) मूळ वेदांचा अभ्यास केलाय? किती जणांनी एकदा तरी वेद, भगवतगीता वाचून त्यात काय सांगितलं आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय? बहुतेक कुणीच नाही. कमीतकमी, वेद किती आहेत हे तरी माहीत आहेत का? किव येतेय लोकांच्या या असल्या मानसिकतेची. आपण आपल्या मूळ, चांगल्या गोष्टी विसरत चाललोय, त्याच गोष्टीचे अनुकरण दुसऱ्या देशांतील लोक करत आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर, आपल्या धर्मात होम हवन करणे, यज्ञ करणे याला महत्व आहे. याकडे आपण कधी लक्ष दिले नाही व ते आपण कधी करण्याचा विचारही करत नाही, आणि तिकडे अमेरिकेत युनिव्हर्सिटी स्थापन करून लोकांचे त्यावर संशोधन चालू आहे. केवळ होम हवंन यज्ञ यावर संशोधन करण्यासाठी अग्निहोत्र युनिव्हर्सिटी ची स्थापना केली गेली आहे. हे आपल्याला कदाचित माहीतही नसेल. होमहवन करण्याचे किती फायदे आहेत हे संशोधन करून, त्यापाठीमागील शास्त्रीय कारणे त्यांना समजली व त्यावर तिकडे अभ्यासक्रम तयार करून तो शिकविला जातो आहे आणि आपण व्यस्त आहोत वेगवेगळे डे, वेगवेगळ्या, नको त्या चाली रीती, नको त्या गोष्टी, ज्यातून आपले व आपल्या समाजाचे नुकसान होणार आहे त्या आत्मसात करण्यात. लोक आपल्याकडून काय घेतात आणि आपण लोकांकडून काय घेत आहोत. असो. कुणी काय घ्यायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. -गणेश नरवडे. Ganesh B. Narawade (talk) 18:19, 19 February 2018 (UTC)